आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दराडेंच्या बंगल्यासाठी भाजप नगरसेवक सरसावले; महापौरांच्या बंगल्यावरून संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असताना प्रवीण दराडे यांना मलबार हिलचा पालिकेचा बंगला मिळाला झाला होता. तो महापौरांचे निवासस्थान म्हणून शिवसेनेला हवा आहे. त्यासाठी शिवसेना सध्या सरकारशी निकराचा संघर्ष करत आहे.  बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीत भाजप सदस्यांनी महालक्ष्मी येथील प्रस्तावित जिमखान्याच्या जागी महापौर निवास्थान बांधावे अशी सूचना केली. त्यावर शिवसेना-भाजपात वाद झाला. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील दराडेंचा  बंगला वाचवण्यासाठी भाजप अशी सूचना करत आहे, असा आरोप शिवसेना सदस्यांनी केला.

शिवाजी पार्कचे महापौर निवासस्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे महापौरांसाठी पर्यायी बंगला कुठे द्यायचा? हा वादाचा विषय झाला आहे.

 

भायखळ्याच्या राणी बागेतला बंगला महापौरांना मान्य नाही. मलबार हिल येथे जल अभियंत्यांचा टुमदार बंगला आहे. मात्र, तो पूर्वीच मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव असताना प्रवीण दराडे यांना दिला आहे. दराडे सध्या एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त आहेत. तरी तो बंगला दराडे यांच्याकडे आहे. कारण दराडे यांच्या पत्नी पल्लवी दराडे मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. बंगला पालिकेचा असल्याने त्याबाबत कोणी हरकत घेतली नाही. आता पल्लवी यांची बदली झालेली आहे. त्या अन्न व औषध प्रशासनाच्या सचिव आहेत. मग पालिकेचा बंगला हा दराडे दांपत्याकडे का? ,असा सवाल शिवसेना नगरसेकांचा आहे.प्रवीण दराडे सेवेत असेपर्यंत म्हणजे २०२८ पर्यंत तो बंगला त्यांना राज्य सरकारने दिल्याची बाब माहिती अधिकारात पुढे आली आहे. शिवसेनेच्या हट्टापायी पालिका प्रशासनाने दराडे यांना बंगला खाली करण्यासदंर्भात सहा नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर राज्य सरकारने आमच्या संमतीविना नोटीस पाठवायची नाही, अशी पालिका प्रशासनाला तंबी दिली आहे. दरम्यान, मनपाच्या आजच्या सभेतही भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार खटके उडाल्याची चर्चा केला.

बातम्या आणखी आहेत...