आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; विराेधी कारवायांचा ठपका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी - Divya Marathi
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी

नागपूर- पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात अाली. त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. 

 
नागपूर शहर काँग्रेसमध्ये माजी खासदार विलास मुत्तेमवार विरुद्ध नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अशी गटबाजी अाहे. मुत्तेमवार हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात, तर राऊत, चतुर्वेदी व त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही महिन्यांपासून मुत्तेमवार व अशाेक चव्हाण यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील दुफळी अधिकच चव्हाट्यावर आली होती. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अनेक बंडखोर उमेदवार उभे करण्यात आले होते. या उमेदवारांना चतुर्वेदी यांनी पाठबळ दिल्याचा अारेाप अाहे. तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपुरात अालेले अशाेक चव्हाण यांच्यावर पक्षातील कार्यकर्त्याने शाईफेक केली हाेती. त्यातही चतुर्वेदी यांचे नाव अाले हाेते. एकूण शाईफेकीसह इतर प्रकरणांमुळे पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून अखेर चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात अाली. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार पक्षाचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला.  

 

राऊत यांनाही धक्का  
माजी सनदी अधिकारी, नागपूर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू आणि बहुजन समाज पार्टीचे नेते किशोर गजभिये यांनी आठवडाभरापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासाठीही अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेतल्याची माहिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राऊत यांना शह देण्यासाठी गजभियेंना काँग्रेसमध्ये आणण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आजवर उत्तर नागपुरातून निवडून येत होते. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, काँग्रेसने त्यांच्या हकालपट्टीसाठी सादर केलेले निवेदन..

बातम्या आणखी आहेत...