आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी भिवंडीत येताच \'त्या\' नेत्याच्या पत्नीची व मुलीची घेतली आवर्जून भेट, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांनी भिवंडी येथील दिवंगत काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी व मुलीची भेट घेतली. - Divya Marathi
राहुल गांधी यांनी भिवंडी येथील दिवंगत काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी व मुलीची भेट घेतली.

मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौ-यावर आहेत. आज सकाळी आठ वाजता ते मुंबईत दाखल झाले. यानंतर ते भिवंडी कोर्टात हजर राहण्यासाठी भिवंडीकडे रवाना झाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी भिवंडी येथील दिवंगत काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी व मुलीची भेट घेतली. 

 

मनोज म्हात्रे यांची 14 फेब्रुवारी 2017 रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या काळात हत्या करण्यात आली होती. मनोज म्हात्रे हे भिवंडीत काँग्रेसचे नगरसेवक होते. मात्र, राजकीय वर्चस्वातून भाजप पदाधिकारी असलेला त्यांचा चुलतभाऊ प्रशांत भास्कर म्हात्रे यांनी मनोज यांची हत्या घडवून आणली होती. त्यावेळी एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले होते. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह 19 आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी आज सकाळी भिवंडी कोर्टात हजेरी लावण्याआधी मनोज म्हात्रे यांच्या भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील घरी भेट देऊन दिवंगत म्हात्रे यांची पत्नी व मुलीची भेट घेतली. काँग्रेस पक्ष तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही राहुल यांनी यावेळी दिली.    

 

राहुल गांधी यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत-

 

राहुल गांधी यांचे आज सकाळी आठ वाजता मुंबईत आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत यांनी राहुल यांचे मुंबईत स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...