आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चकमक फेम' दया नायक यांना न्यायालयाचीही क्लीन चिट; एसीबीचा अहवाल मान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या विरोधात झालेल्या बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याने प्रकरण बंद करण्याबाबत एसीबीने दिलेला अहवाल विशेष एसीबी न्यायालयाने अखेर स्वीकारला आहे. नायक यांची मालमत्ता त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांच्या प्रमाणात दहा टक्के इतकीच असून कोणताही नियमभंग होत नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येत नसल्याचे या अहवालात एसीबीने नमूद केले आहे. त्यामुळे दया नायक यांना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.  


मुंबईतील गुन्हेगारी जगतातील तब्बल ८० पेक्षा अधिक गुंडांना यमसदनी धाडणारे उपनिरिक्षक दया नायक यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून २००६ साली निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर एसीबीमार्फत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीअंती एसीबीने दिलेल्या अहवालानुसार मुंबई उपनगरातील चारकोप परिसरात नायक यांच्या मालकीचा एक आठशे चौरस फुटांचा फ्लॅट आणि एक जीप असून त्यांच्या मालकीची एक वित्तीय कंपनी आहे. तसेच नायक यांनी मंगळूर नजीकच्या आपल्या मूळ गावात एका शाळेच्या इमारतीसाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही एसीबीच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी २००६ रोजी दया नायक यांना अटक करून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर ५९ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर २० एप्रिल २००६ रोजी नायक यांना जामीन मिळाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर एसीबीने नायक यांच्याविरोधात कारावाईची परवानगी तत्कालीन पोलिस महासंचालक विर्क यांच्याकडे मागितली होती. मात्र, पुरेशा सबळ पुराव्यांच्या अभावी महासंचालकांनी ही परवानगी नाकारली होती.  

 

पदोन्नतीचा मार्ग मोकळा 

एसीबीच्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे खातेनिहाय चौकशी करण्याचे निर्देश मात्र विर्क यांनी एसीबीला दिले होते. त्यानुसार झालेल्या चौकशीतून कोणतेही सबळ पुरावे बाहेर न आल्याने २०१० मध्ये एसीबीने या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याने प्रकरण बंद करण्यातचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र, त्यावेळी न्यायालयाने तो फेटाळला होता. आता २०१६ मध्ये नायक यांचा पोलिस खात्यात पुनर्प्रवेश झाला असून विशेष एसीबी न्यायालयाचे न्या. दिलीप गडधे यांनी एसीबीचा अहवाल स्वीकारल्याने नायक यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...