आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या त्या सहा नगरसेवकांबाबत एक दोन दिवसांत निकाल, निकालावर सर्व गणिते अवलंबून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबल अत्यंत अटीतटीचे असल्याने मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांवर शिवसेनेची मदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच त्यांच्याबाबत कोकण आयुक्त काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. येत्या एक दोन दिवसांत याबाबत आयुक्तांकडून निकाल दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अगदी काट्याची टक्कर झाली. पण स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. शिवसेनेने भाजपपेक्षा तीन जागा जास्त मिळवल्या. पण शिवसेना खरी सत्ते आली ती मनसेच्या सहा आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर. भाजपने काहीही झाले तरी मुंबईत आमचीच सत्ता असेल असे दावे केले होते. पण त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेचे सहा नगसरेवक फोडले आणि संपूर्ण चित्रपट पालटले. पण मनसेने या नगरसेवकांच्या विरोधात धाव घेत त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तर या सहा नगरसेवकांनी आयुक्तांकडे त्यांचा स्वतंत्र गट स्थापण्याची परवानगी मागितली आहे. जवळपास तीन महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र आता लवकरच या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष याकडे वळले आहे. या प्रकरणी जर मनसेच्या बाजुने निकाल लागला तर शिवसेनेला पुन्हा एकदा अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. 

 

हे आहेत सहा नगरसेवक 
वॉर्ड क्रमांक 197 - दत्ताराम नरवणकर 
वॉर्ड क्रमांक 126 - अर्चना भालेराव 
वॉर्ड क्रमांक 156 - अश्विनी मतेकर
वॉर्ड क्रमांक 189 - हर्षल मोरे
वॉर्ड क्रमांक 163 - दिलीप लांडे
वॉर्ड क्रमांक 133 - परमेश्वर कदम


मुंबई महापालिकेतील विद्यमान स्थिती 
एकूण नगरसेवक - 227
शिवसेना आणि अपक्ष (4) - 88
भाजप आणि मित्रपक्ष(1) आणि अपक्ष (3) - 85
काँग्रेस - 30
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
मनसे - 7 (पैकी 6 शिवसेनेच्या पाठिशी) 
सपा - 6 
एमआयआम -2 

बातम्या आणखी आहेत...