आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOVE STORY: नागपूरात फुलले केजरीवालांचे प्रेम, प्रपोज करायला लागली चक्क दोन वर्ष!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंद यांचा सच्चेपणा आणि देशासाठी काही तरी करण्याची धडपड या गुणांनी सुनिता यांचे हृदय सहज भाळले. - Divya Marathi
अरविंद यांचा सच्चेपणा आणि देशासाठी काही तरी करण्याची धडपड या गुणांनी सुनिता यांचे हृदय सहज भाळले.

नागपूर- व्हॅलेंटाईन डे बुधवारी साजरा होत आहे. यानिमित्त आज आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांची निवृत्त आयआरएस पत्नी सुनीता यांच्या लव्हस्टोरीबाबत माहिती देणार आहोत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात सुरु झालेल्या लढाईत उतरलेले अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी भारतीय राजस्व अधिकारी (आयआरएस) असलेले अरविंद केजरीवाल याचे ट्रेनिंगदरम्यान सहकारी सुनिता यांच्याशी प्रेम जुळले. केजरीवाल यांचे एकतर्फी होते, असे या प्रकरणात म्हणता येणार नाही. सुनिता यांच्या मनातही केजरीवाल यांनी घर केले होते. मात्र, सुनिता यांना 'दिल की बात' सांगण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल दोन वर्षाचा कालावधी लागला. नागपूरात फुलले प्रेम...

 

- अरविंद आणि सुनिता यांची पहिली भेट आयआरएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर येथील राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत झाली. 
- नागपूरमधील अकादमीत दररोज तासंतास चर्चा करायचे. नेहमी सोबत राहायचे. लहानपणापासून अरविंद अत्यंत साधे आणि सरळ बोलणारे होते. त्यांच्या याच स्वभावाने सुनिता प्रभावित झाल्या.
 - केजरीवाल यांना सुनिता आवडू लागल्या. सुनिता यांच्या मनातही केजरीवाल यांनी घर केले होते. मात्र, दोघेही याबाबत उघड काहीच बोलत नसे. 
- दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घ्यायला बराच वेळ घेतला. प्रत्येक भेटीत त्यांचे डोळी बरेच काही बोलून जात होते. 
- परंतु, तो महत्त्वाचा शब्द बोलता येत नव्हता. दोघांतही ती हिंमत होत नव्हती. पण अरविंद यांचा सच्चेपणा आणि देशासाठी काही तरी करण्याची धडपड या गुणांनी सुनिता यांचे हृदय सहज भाळले. 
- त्यांना अशाच स्वभावाच्या व्यक्तिसोबत लग्न करायचे होते. दोघांची भेट झाल्यावर त्यांची चांगली मैत्री झाली. 
- अखेर दोन वर्षानंतर अरविंद यांनी सुनीताला लग्नासाठी प्रपोज केले. सुनीताने होकार दिला. पण
सुनिताला 'दिल की बात' सांगण्यासाठी केजरीवालांना तब्बल दोन वर्षे लागली. 

 

घरच्यांनी आनंदाने दिली परवानगी-

 

- सुनिता यांचे कुटुंब दिल्लीत राहत होते. अरविंद हरियाणातील हिसार या प्रांतातील होते. दोघांनी घरी प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यावर दोघांच्या घरून सहज परवानगी मिळाली.
- एकाच जातीचे असल्याने त्यांच्या विवाहाला कोणी आडकाठी घातली नाही.
- अखेर 1994 मध्ये दोघांचा साखरपुडा आटोपला. त्यानंतर दोघांच्या प्रेमाला खरी सुरवात झाली. दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालविण्यास सुरवात केली. 
- दोघांनी सोबत काही अविस्मरणीय चित्रपट बघितले. दोघे डेटिंगवरही गेले. एकमेकांना गिफ्टही दिले.
- नोव्हेंबर 1994 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या वेळी दोघे आयआरएस ट्रेनिंगलाच होते. 1995 मध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर दोघांनी दिल्लीकडे वाटचाल केली.
- लग्नानंतर ठीक एका वर्षाने सुनिता यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव हर्षिता ठेवण्यात आले. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव पुलकित ठेवण्यात आले.

 

केजरीवालांनी 2006 साली तर सुनीताने 2016 ठोकला नोकरीला रामराम-

 

- देशाची सेवा करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी 2006 साली आयआरएस सेवेचा राजीनामा दिला. पत्नीने दाखविलेल्या विश्वासामुळेच ते एवढा मोठा निर्णय घेऊ शकले.
- पुढे त्यांना रोमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले. माहिती अधिकारासह सामाजिक चळवळीत त्यांनी घेतला.
- 2010 साली इंडिया अगेन्स्ट करप्शनची स्थापना करत अण्णा हजारेंसोबत राष्ट्र चळवळीत ओढले गेले.
- केजरीवालांच्या निवृत्तीनंतर पुढे बरोबर दहा वर्षांनी म्हणजे 2016 साली सुनीता यांनीही आयआरएस सेवेतून निवृत्ती घेतली.
- 1993 च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी राहिलेल्या सुनीता यांनी 22 वर्षे नोकरी केली. 

 

राजकीय सारीपटात 'छप्पर फाडके' यश-

 

- केजरीवाल यांनी 2011 साली काँग्रेस सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात तोंड फोंडले. सोबत अण्णा व इतर सहकारी होते.
- याच काळात त्यांना कपिल सिब्बल यांनी त्यांना आंदोलन करणे सोपे आहे. एखादा पक्ष काढून बघा मग राजकारण काय असते ते कळेल असे सुनावले.
- अरविंद केजरीवाल यांनी सिब्बल यांचे आव्हान स्वीकारले व 2012 साली आम आदमी पक्षाची स्थापना केली.
- आम आदमी पक्षाने 2013 साली दिल्लीत झालेली विधानसभा निवडणूक लढविली. 70 सदस्यांच्या विधानसभेत केजरीवालांच्या पक्षाला 28 जागा मिळाल्या व काँग्रेसच्या मदतीने ते मुख्यमंत्री बनले.
- पण 2014 साली त्यांनी विविध मागण्यावरून त्यांनी सरकारचा राजीनामा दिला. पुढे दिल्लीत वर्षभर राष्ट्रवादी राजवाट राहिली. 
- नंतर 2015 साली झालेल्या निवडणुकीत केजरीवालांच्या नेतृत्त्वाखाली आम आदमी पक्षाने 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकल्या. भाजपला तीन तर काँग्रेसला भोपळा मिळाला.
- आता नुकतेच त्यांच्या पक्षाच्या 20 आमदारांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे. प्रकरण कोर्टात गेले आहे. मात्र त्यांच्या सरकारला कोणताही धोका नाही.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अरविंद केजरीवाल व सुनीतांचे काही फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...