आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालय की सर्कशीचा फड, नायलॉनच्या जाळ्या लावण्याचा निर्णयावर धनंजय मुंडेंची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालय आहे की सर्कशीचा फड? अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने आत्महत्या रोखण्यासाठी आज मंत्रालयाच्या आवारात नायलॉनच्या जाळ्या लावण्याचा निर्णय घेतला. यावर मुंडेंनी ट्विटद्वारे खरमरीत टीका केली.

 

 

चांगला प्रयत्न पण...

मंत्रालयात मागच्या पंधरवड्यात तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातील त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने जाळ्या लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने हा अतिशय चांगला प्रयत्न आहे. मात्र सरकारने आत्महत्यांच्या मूळ कारणाचा विचार कऱण्याची आवश्यकता आहे”, असेही मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...