आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचा सावकारी फास सुटेना, सुलभ पीककर्ज अभियानाचा पुन्हा एकदा बोजवारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरकारच्या सुलभ पीककर्ज अभियानाचा दुसऱ्यांदा बोजवारा उडाला आहे. बँकांकडून कर्ज मिळण्यात दिरंगाई झाल्याने पश्चिम विदर्भातील 90 टक्के शेतकरी अजूनही कर्जापासून दूरच आहेत. परिणामी, गावोगावच्या अनेक शेतकऱ्यांवर खरीप हंगामासाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. उधारी, हात उसनवारी आणि दागिने गहाण ठेवूनच यंदा खरीप पेरणीच्या वेळा साधाव्या लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गळ्यातला सावकारी फास काही केल्या सुटत नाही, अशीच परिस्थिती आहे.

 

यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेले असताना मोठी अडचण निर्माण झालेली आहे ती खरीप पीक कर्ज वाटपाची. आज खान्देशात, विशेषतः अमरावती विभागात 9 टक्के सुद्धा कर्जवाटप झालेले नाही. साधारण सात हजार कोटींचे टार्गेट असताना फक्त सहाशे कोटींचेच कर्जवाटप झालेले आहे. केवळ पश्चिम विदर्भातच नाही तर खान्देश, मराठवाडा व इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटपाची ही अशीच परिस्थिती आहे, अशी माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली. 

 

या परिस्थितीला सत्ताधारी सरकार कारणीभूत आहे. कर्जमाफी घोषणेनंतर सरकारने यात वेळोवेळी भूमिका बदलली. दर महिन्याला वेगवेगळे जीआर काढून सरकारने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला. कर्जमाफीबाबतही 34 हजार कोटी, 90 हजार शेतकरी, ऐतिहासिक कर्जमाफी अशा सर्व घोषणा हवेत केल्या, त्यामुळे त्या अपयशी ठरल्या. आज वर्षभराने आढावा घेतला तर 10 टक्के रक्कम सुध्दा शेतकऱ्यांच्या वाटेला आलेली नाही, असे धोंडगे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...