आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर व्याज आकारणी नकाे; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - शासनाने कर्जमाफी  योजनेंतर्गत मंजूर  कर्जखात्यांवर बँकांनी  ३१ जुलै २०१७ नंतर व्याज आकारणी करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सर्व बँकांना दिले अाहेत. एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी विशेष मोहीम राबवून शेतकऱ्यांना थकबाकीची उर्वरित रक्कम भरण्यास प्रोत्साहित करावे, तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावेत, असे अादेशही त्यांनी दिले.


कर्जमाफी याेजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. यापूर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झाला अाहे. तरी देखील जुलै २०१७ च्या नंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर काही बँका व्याज आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकांनी अशी व्याज आकारणी करू नये व असे केल्यास बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 
कर्जमाफी योजनेतर्गत एकूण ३१.३२ लाख कर्ज खात्यांवर १२,३०० कोटी एवढी रक्कम वर्ग केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...