आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला निधी नकाे;श्रीमंत काेकाटे, अामदार अाव्हाड यांंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘इतिहासकार जेम्स लेन यांच्या वादग्रस्त व बंदी असलेल्या ग्रंथाची पाळेमुळे शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांच्या इतिहास लेखनात आहेत, त्याच पुरंदरेंच्या पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पास सरकारने तीनशे कोटींचा निधी जाहीर केला आहे. हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या बदनामी करणाऱ्यांचा बक्षीस देऊन गाैरव केलेला आहे’, असा आरोप इतिहासकार श्रीमंत कोकाटे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.  


शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा शिवसृष्टी प्रकल्प खासगी आहे. त्याला सरकारने मदत करणे चुकीचे आहे. हवे तर सरकारने शिवसृष्टी उभी करावी. पुरंदरे यांनी जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारा इतिहासच कायम  रेखाटला आहे. पुरंदरे यांनी मराठी समाजाचे ध्रुवीकरण व्हावे, यासाठी इतिहास लेखनाचा खुबीने वापर केला. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला सरकारने निधी देणे योग्य नाही, असे  कोकाटे म्हणाले.  


पुणे जहागिरीची व्यवस्था पाहणारे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हे तर चाकर होते, हे इतिहासात सिद्ध झालेले आहे. मात्र तरीसुद्धा शिवशाहीर पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रात कायमच कोंडदेव यांना छत्रपतींचे गुरु म्हणून उभे करण्याचे काम केले. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीत दादोजी हे छत्रपतींचे गुरु म्हणून असणार आहेत. म्हणून पुरंदरे यांची शिवसृष्टी कदापि मान्य नाही, असे आव्हाड यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...