आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुबालावर फिदा होता हा अंडरवर्ल्ड डॉन, नाही मिळाली म्हणून शोधली डुप्लीकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोना (डावीकडे) चा चेहरा अॅक्ट्रेस मधुबालाशी मिळताा जुळता होता. अॅक्ट्रेस मधुबाला (उजवीकडे) - Divya Marathi
सोना (डावीकडे) चा चेहरा अॅक्ट्रेस मधुबालाशी मिळताा जुळता होता. अॅक्ट्रेस मधुबाला (उजवीकडे)

मुंबई- 'मुगल-ए-आज़म' मधील अनारकली म्हणजेच मधुबाला हिचा आज जन्मदिन आहे. मधुबाला वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी हे जग सोडून गेली होती. तिच्या सौंदर्यावर भाळणा-यांची कमी नव्हती पण त्यातीलच एक होता तो म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान. सांगितले जाते की, तो अॅक्ट्रेस मधुबाला हिच्यावर प्रेम करायचा. मधुबाला मिळाली नाही म्हणून शोधली डुप्लिकेट...

 

- सांगितले जाते की, हाजी मस्तान मधुबाला हिला खूपच पसंत करत होता आणि तिच्यावर फिदा होता.
- मधुबालावर तो इतका भाळला होता की, तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित होता. मात्र, आपले प्रेम तिच्याकडे व्यक्त करण्याआधीच मधुबालाने या जगाचा निरोप घेतला.
- मधुबालाच्या मृत्यूनंतर हाजी मस्तानने तिची डुप्लीकेट आणि स्ट्रगलिंग अॅक्ट्रेस सोनासोबत लग्न केले. 
- सोनाची जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री झाली तेव्हा लोकांना एक क्षण वाटले की, मधुबाला परत आली. सोना आणि मधुबालाचे हास्य ते अॅक्टिंग यात बरीच समानता होती.

 

असे झाले सोनासोबत लग्न- 

 

- हाजी मस्तानने सोनाला पहिल्यांदाच आपल्या प्रॉडक्शनमधील एका फिल्ममध्ये काम करताना पाहिले. त्याचवेळी त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
- लग्नाचा प्रस्ताव घेऊन हाजी मस्तान हा सोना आणि तिच्या आईजवळ पोहचला. सोनाने हाजी मस्तानसोबत लग्नाचे प्रपोजल लगेच स्वीकारले.
- हाजी त्याआधीच विवाहित होता पण त्याचा सोना व हाजीच्या नात्यावर कधीच परिणाम जाणवला नाही.

 

हाजीच्या मृत्यूनंतर कुटुंबच बनले शत्रू-

 

- लग्नाला काही वर्षे लोटल्यानंतर हाजी मस्तानचा मृत्यू झाला पण त्याच्या मृत्यूनंतर सोनाला असे काही वाईट दिवस आले की तिला रोजच्या जेवणाचीही भ्रांत पडायची. 
- एकीकडे सोना आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करू इच्छित होती तर दुसरीकडे, हाजी मस्तानचा कुटुंबिय तिचे शत्रू बनले होते.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हाजी मस्तानचे असेच आणखी काही फोटोज.....