आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी याचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुंबईतील शिवाजी पार्क येथील घरी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अधिकारी हे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक मोठे नाव होते.

 

त्यांनी ४५ नाटके, १६ मराठी, हिंदी चित्रपट आणि सात मालिकांत काम केले होते.  अभिनेते नाना पाटेकरांसोबत वजूद, संजय दत्तच्या लगे रहो मुन्नाभाई, डिटेक्टिव्ह नानी यासारखे हिंदी चित्रपट आणि संध्याछाया, ढोलताशे, हसवाफसवी यासारख्या नाटकांत त्यांनी काम केले.

 

डॉ. अधिकारी हे ऑटोमिक रिसर्च सायंटिस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, इप्टा नाट्यचळवळीत कार्यरत होते. अधिकारी यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनासंबंधी वृत्तपत्रातून लिखाणही केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या आणि एक पुत्र असा परिवार आहे.

 

दरम्यान, रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत अधिकारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्यकलावंत उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...