आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती, राज्यपालांनी दिले नियुक्ती पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सहा महिन्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले आहेत. रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी डॉ. पेडणेकर यांच्या नियुक्तीची घोषणा करून राजभवनात त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

 

गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. तेव्हापासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

 

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते. 

बातम्या आणखी आहेत...