आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK ना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा, 50 कोटी भरण्यास पुन्हा अपयश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यासाठी डीएसके पत्नी हेमांगींसह उपस्थित राहिले. मात्र, 50 कोटी रूपये भरण्यास त्यांना पुन्हा एकदा अपयश आले. त्याचवेळी त्यांनी 12 कोटी संपत्तीची कागदपत्रे कोर्टात सादर केली. यावर कोर्टाने या मालमत्तेतून गरजू पीडित गुंतवणूकदारांना पैसे पर द्यावेत असे आदेश दिले.

 

अटकपूर्व जामिनासाठी डीएसकेंना 50 कोटी रूपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, डीएसकेंना ही रक्कम अद्याप कोर्टात जमा करता आलेली नाही. त्यामुळे कोर्टाने तीन-चारदा त्यांचे म्हणणे ऐकत घेत दिलासा दिला होता. मात्र, आता डीएसके पैसे भरण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. मात्र, याबाबत  अंतिम सुनावणी 22 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.

 

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर असलेले डीएसके मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते आपल्या गुंतवणूकदारांचे व ठेवीदारांचे व्याज व मुद्द्ल देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. डीएसकेंनी आपल्या कंपनीद्वारे वैयक्तिक नफा कमाविल्याचाही आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...