आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीकडे लग्झरी कार्सचा ताफाच, अखेर अलिशान व महागड्या कार जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरूवारी 9 लग्झरी कॉर्स आणि 94 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली गेली. - Divya Marathi
गुरूवारी 9 लग्झरी कॉर्स आणि 94 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली गेली.

मुंबई- 11 हजार 400 कोटी रूपयांना चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीचा फास हळू हळू आवळला जात आहे. गुरूवारी ईडीने नीरव मोदीच्या अलिबागमधील फॉर्म हाऊसवरून 9 महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्याआधी मंगळवारी सीबीआयने मुंबई स्थित अलिबागमध्ये 27 एकरात पसरलेल्या नीरव मोदीच्या अलिशान फॉर्म हाऊसची झाडाझडती घेतली होती. ईडीने केल्या नीरव मोदीच्या केल्या 9 कार जप्त....

 

- नीरव मोदी यांच्या 9 लग्झरी कॉर्स जप्त केल्या आहेत.
- यात रोल्स रॉयस घोस्ट, एक पोर्श पैनामरा, 2 मर्सिडीज बेंज GL-350 CDI, एक टोयोटा फॉर्च्युनर, 3 होंडा सिटी कार आणि 1 इनोवा कारचा समावेश आहे. रॉल्स रॉयस कारची किंमत सुमारे 6 कोटी रुपये सांगितली जात आहे.
- याशिवाय 7.80 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेयरही जप्त करण्यात आले. दुसरीकडे मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपच्या 86.72 कोटींचे म्युच्युअल फंड आणि शेयरही जप्त केले आहेत.
- ईडीने गिली इंडिया कंपनीचे डायरेक्टर अनियथ शिवरामनयांचे मुंबईतील घर सील केले आहे.
- सीबीआय व ईडीने आतापर्यंत नीरव मोदींच्या विविध कार्यालया व घरांवर छापे टाकून 5649 कोटींचे दागिने जप्त केले आहेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नीरव मोदीच्या जप्त करण्यात आलेल्या गाड्याचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...