आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाेल नाक्यांवरील पिवळ्या रेषेचे नियम पाळा; एकनाथ शिंदे यांचा कारवाईचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टोल नाक्यावर टोल भरणाऱ्या वाहनांची रांग तेथील पिवळ्या रेषेच्या बाहेर गेल्यास टोल न आकारताच वाहने साेडावीत तसे न झाल्यास संंबंधितांवर कठाेर कारवाई केली जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिला.  


सलग तीन दिवस लागून अालेल्या सुट्यांमुळे मुंबर्इकर  सकाळपासूनच माेठ्या संख्येने शहराबाहेर जात हाेते. त्यामुळे मुंबर्इबाहेर जाणाऱ्या महामार्गावर माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी झाली हाेती. एेराेली येथील टाेल नाक्यावर नियमबाह्य टाेल वसुुली हाेत हाेती, पिवळ्या रेषेच्या नियमाबाबतचा शासनादेश मिळाला नसल्याचे सांगत या नाक्यावर वसुली करण्यात येत हाेती. त्यामुळे  टाेल वसुलीच्या विराेेधात मनसेच्या कार्यकत्यांनी अांदाेलन करून टाेल वसुली बंद पाडली. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी वरील आदेश दिले.  


टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. तसेच यातून  मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावण्यात अाली अाहे. नियमांचे पालन न करता टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येर्इल. त्यामुळे. काही दिवसांतच तुम्हाला टोल नाक्यावरील चित्र पालटलेले दिसेल, असे शिंदे यांनी सांगितले.  


रांग मोठी झाल्यास वसुली नको
टोल वसुलीमुळे विविध महामार्गांवर वाहतुकीची रोजच्या रोज कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेचा नियम करण्यात आला. त्यानुसार, टोलनाक्यापासून १० वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर एक पिवळी रेषा आखण्यात आली आहे. या रेषेच्या पुढे वाहनांची रांग लागल्यास टोल वसुली न करता वाहने सोडायची असा नियम आहे. 

बातम्या आणखी आहेत...