आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परत येत आहे हा इन्काऊंटर स्पेशलिस्ट, केले आहेत आजपर्यंत 80 हून अधिक चकमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इन्काऊंटर फेम दया नायक यांना बेनामी संपत्ती प्रकरणात विशेष न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे. यामुळे दया नायक यांचा प्रमोशनचा मार्गही आता मोकळा झाला आहे. दया नायक यांची मालमत्ता कमाईेच्या 10 टक्के आहे त्यामुळे असे कोणतेही प्रकरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाने विशेष न्यायालयाने एसीबीच्या संपत्तीवर मोहर उमटवली आहे. एसीबीने आपल्या रिपोर्टद्वारे दया नायक हे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. 

 

 

2006 मध्ये करण्यात आली होती अटक
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये 80 हून अधिक गुंडांचा खात्मा करणारे पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांना बेनामी संपत्तीच्या आरोपाखाली 2006 मध्ये मुंबईल्या पोलिसांनी निलंबित केले होते. आरोपांचा तपास एसीबीकडून करण्यात आला होता. 59 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर नायक यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर नायक यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागले. या तपासात नायक यांच्याविरोधात पुरेसे पुरावे मिळाले नव्हते. एसीबीने याबाबतचा अहवाल 2010 मध्ये  विशेष कोर्टात सादर केले. विशेष एसीबी कोर्टानेही दया नायक यांना क्लीनचीट दिलेली आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

 

 

बातम्या आणखी आहेत...