आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात मनाेरंजन हब हाेण्यासाठी माध्यमांची एकजूट हवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारत हा जागतिक स्तरावर करमणूक आणि माध्यमांचे हब होण्याची डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्याची ताकद असलेला देश आहे. सर्व क्षेत्रांतील माध्यमांनी एकजूट हाेऊन काम केल्यास महाराष्ट्र देशातील मनाेरंजनाचे मुख्य केंद्र हाेऊ शकेल. परंतु त्यासाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी, परवानग्यांत कपात अादी माध्यमातून अावश्यक ते पाठबळ देण्याची गरज अाहे, असे मत प्रख्यात बाॅलीवूड अभिनेते शाहरुख खान यांनी मंगळवारी मॅग्नेटिक महाराष्ट्रमधील चर्चासत्रात व्यक्त केले. 

 
‘मनाेरंजन अाणि माध्यमांची भविष्यातील वाटचाल’ या विषयावर बाेलताना शाहरुख खान म्हणाला, ‘मनाेरंजन क्षेत्रात भारतासाठी जागतिक पातळीवर माेठी बाजारपेठ उपलब्ध अाहे. परंतु त्या दृष्टीने अापण अद्याप विचार केलेला नाही. महाराष्ट्राला मनाेरंजनाचे मुख्य केंद्र बनवण्यासाठी मनाेरंजन क्षेत्राने संघटित हाेणे ही काळाची गरज अाहे. हाॅलीवूडने मनाेरंजन उद्याेग वेगाने संघटित केला. अाज देशात साेशल मीडिया, डिजिटल मीडियासारखी मनाेरंजनाची नवनवीन माध्यमे पुढे येत अाहेत. त्यामुळे मनाेरंजन क्षेत्रातील व्यावसायिक क्षमतांचा पूूर्ण क्षमतेने वापर करण्याची गरज अाहे. त्यासाठी मनाेरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व माध्यमांनी एकत्र येण्याची गरज अाहे.  भारतात करमणूक आणि माध्यमाच्या क्षेत्रात नीट काम उभे राहिले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतील.’  


कल्पनाशक्तीला काेणीही पायबंद घालू शकत नाही. अापल्या देशात प्रत्येकाकडे कल्पनाशक्ती माेठ्या प्रमाणावर अाहे. त्याचा सुयाेग्य वापर करण्याची गरज अाहे, असे शाहरुख म्हणाला.  मनाेरंजन - मग ते काेणत्याही माध्यमातून मिळाे - प्रेक्षकांच्या रुचीनुसार त्यांना अानंद देणे गरजेचे अाहे. प्रेक्षकांचे मनाेरंजन अधिक अानंददायी करण्यासाठी चांगला कंटेंट देणे ही मुख्य बाब अाहे. अाज मनाेरंजन क्षेत्रातील प्रत्येकाकडे चांगली माहिती देण्याची हाताेटी अाहे. त्याची याेग्य ती जुळवणी करण्याची गरज असल्याचे मत शाहरुख खानने व्यक्त केले. 


ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी म्हणाले, ‘आपण जागतिक स्तरावर शिरकाव करू शकतो इतकी ताकद आपल्या माध्यमात आहे. त्यासाठी आपल्या देशाची मानसिकता बदलण्याची गरज अाहे.’  अमेझॉनच्या विजय सुब्रह्मण्यम आदींनी आपल्याकडील आव्हान आणि त्यासाठीच्या नियोजन आदींची माहिती दिली.


जे अावडते ते काहीही करून लाेक पाहतीलच
‘पद्मावत’सारख्या चित्रपटावरून वाद झाले तरी लाेकांना जे अावडते ते लाेक बघणारच अाहेत. त्यांच्यासाठी केवळ चित्रपटच नव्हे तर त्यासाठी अन्य साेशल माध्यमेदेखील अाता त्यांच्यासाठी उपलब्ध अाहेत. वाद हाेतच राहणार, चित्रपटातून विषय मांडले नाही तर ते लपणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त हाेईलच. वाद झाले तरी चित्रपट बनवण्यापासून काेणी राेखू शकत नाही, असे शाहरूख म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...