आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी मुदतवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राखीव प्रवर्गातून सदस्य व सरपंचाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. निवडणूक जिंकल्यानंतर ६ महिन्यांत त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी सादर करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दुरुस्ती करण्यात येईल. २०१६ च्या महाराष्ट्र अधिनियमानुसार ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी राखीव जागांमधून निवडून आलेल्या उमेदवाराला निवडून आलेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. ते सादर न केल्यास सदस्यत्व रद्द होते.  मात्र, केवळ जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी एखाद्या मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...