आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनापू्र्वी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली, महामंडळांच्या नियुक्त्याही होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याअखेरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाण्यापूर्वी फडणवीस आपल्या मंत्रिमंडळात आणखी काही सहकारी जोडतील. फडणवीस सरकारचा हा कदाचित शेवटचाच विस्तार ठरू शकतो. यानंतर थेट निवडणूकांनाच लागतील अशी शक्यता आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन प्रथमच नागपूरात होत आहे. येत्या 4 जुलै पासून ते सुरू होईल.

 

फडणवीस सरकारचा विस्तार शेवटचा विस्तार जुलै 2016 मध्ये झाला होता. आता त्याला दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. दरम्यान, सरकारमध्ये काही खाती भरली नव्हती. आता नुकतेच कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हद्यविकाराने निधन झाले. त्यामुळे त्यांचे खातेही रिकामे झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना व एकून शेतक-यांतील नाराजी पाहता सरकारला कृषीमंत्री तातडीने नेमा लागणार आहे.

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौ-यावेळी त्यांनी पक्षाचे संघटनमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी राज्य सरकारला जेम-तेम सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आता विस्तार करण्याची योग वेळ आहे असे फडणवीस यांनी शहांना सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर शहांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबरोबरच महामंडळांवर काही पदाधिका-यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

 

विधान परिषदेच्या चार जागांसाठी या महिन्यात निवडणूका होत आहेत. येत्या 25 जूनला मतदान तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 29 जूनला किंवा 2 जुलैला विस्तार होऊ शकतो असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.  

बातम्या आणखी आहेत...