आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पामुळे ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना अधिक विस्तारित झाली:फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना आणखी विस्तारित झाली आहे. सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करण्यात आला असून शेतकरी, गरीब, महिला, युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना त्यातून न्याय देण्यात आला आहे.  किमान आधारभूत किमतीसंदर्भातील शेतकऱ्यांची सुमारे दोन दशकांची मागणी आज पूर्ण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा उपलब्ध करण्यासह  शेती क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग आणि फलोत्पादनास चालना देण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...