आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांत शिक्षकांच्या 24 हजार जागा भरू: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात येत्या सहा महिन्यांत शिक्षकांच्या २४ हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे राज्यातील डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  


तावडे म्हणाले, आधीच्या पद्धतीमध्ये प्रत्येक तुकडीला एक शिक्षक अशी संकल्पना होती. मात्र, आता राइट टू एज्युकेशनने ही संकल्पना मोडीत निघाली. सरकारने संख्या मान्यतेच्या आधारे शिक्षक भरती कशी योग्य आहे? हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सिद्ध केले आहे. त्यानंतर  ही सेंटर भरती केली. 


अनेक शिक्षकांचा आग्रह होता की, शिक्षक भरतीवेळी काही संस्थाचालक पाच लाखांपासून ते १५ लाखांपर्यंतची मागणी करतात. तेव्हा हा भ्रष्टाचार थांबवण्याचे आवाहन शिक्षकांनी केले होते. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सेंटर शिक्षक भरती करून घेतल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...