आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या दादर स्टेशनवर लोकल रेल्वेच्या दोन डब्यांत आग;डब्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मुंबईतील दादर स्थानकावर लोकलच्या दोन डब्यांमध्ये आग लागली.  मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही लोकल ठाण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, वाटेतच लोकलमधून धूर येताना दिसल्यामुळे ती दादर स्टेशनवर थांबवण्यात आली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, दोन्ही डब्यांचे खूप नुकसान झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच दादर स्टेशनवरील पहिल्या क्रमांकाच्या फलाटावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...