आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय तरूणाचा इटालियन तरूणीशी विवाह, इटलीत पहिली भेट तर चीनमध्ये फुलले प्रेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरदेवाचे नाव सुब्रमणी आहे जो चीनमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. - Divya Marathi
नवरदेवाचे नाव सुब्रमणी आहे जो चीनमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर आहे.

महाराष्ट्र/तामिळनाडू- चीनमध्ये एका भारतीय तरूणाचे प्रेम इटलीतील तरूणीवर बसले. दोघांची पहिली भेट झाली आणि पुढे मैत्री झाली, हळू हळू त्यांच्यात प्रेम फुलू लागले. जेव्हा फॅमिलीला आपल्या प्रेमाविषयी त्यांनी माहिती दिली तेव्हा घरातील मंडळीही खुषी-खुषी राजी झाले. नंतर भारतात येऊन दोघांनी सात फेरे घेतले. हिंदू रितीरिवाजानुसार केले लग्न...

 

- भारतीय तरूण तामिळनाडूतील असून त्याचे नाव सुब्रमणी आहे जो चीनमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर आहे.
- त्याचे लग्न फ्लाविया ग्युलियनेली या इटालियन तरूणीसोबत झाले. सुब्रमणीची फ्लावियासोबत भेट इटलीतील एका इव्हेंट दरम्यान झाली होती.
- दोघांत हळू हळू मैत्री झाली आणि नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तसेच पारंपारिक हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार लग्न झाले. 
- दोघांच्या माहितीनुसार, एक-दुस-यांसोबत लग्न करून ते खूपच खूष आहेत.
- दोघांचे प्रेम चीनमध्ये बहरले, फुलले त्यामुळे चीन त्यांच्यासाठी खास ठिकाण आहे.

 

तामिळनाडूत झाले लग्न-

 

- सुब्रमणी आणि फ्लावियाने तामिळनाडूतील नागरकोईल शहरात लग्न केले. 
- या लग्नात दोघांच्या फॅमिलीतील लोक सामील झाले होते. तर फ्लावियाने सुद्धा इंडियन ड्रेसमध्ये सात फेरे घेतले. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार सुब्रमनीने सांगितले की, आमच्या नातेसंबंधाबाबत दोन्ही फॅमिली खूष होते व त्यामुळे त्यांनी लागलीच लग्नाला परवानगी दिली. 
- फ्लावियाचे म्हणणे आहे की, भारतीय कल्चर तिला खूप पसंत आहे. त्यामुळे भारतीय तरूणासोबत लग्न करून ती खूष आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, सुब्रमणी आणि फ्लावियाच्या लग्नाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...