आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटी बँकेला माजी पोलिस महासंचालकांकडून मदत; उपाशी लोकांची भूक भागविणारा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विविध सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त जेवण बनवले जाते. पार्टी संपल्यावर अनेकदा उरलेले जेवण कचऱ्याच्या डब्यात टाकले जाते. हेच जेवण गरजू व उपाशी लोकांना मिळावे यासाठी 2 वर्षांपूर्वी रोटी बँकेची स्थापना करण्यात आली होती. माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंदन यांनी डबेवाल्यांच्या या मोहिमेला साथ देत 3 वाहने उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा खर्च ते स्वत: उचलणार आहेत.

 

 

सुभाष तळेकर यांनी दोन वर्षांपूर्वी मांडलेल्या या संकल्पनेचा मुंबईच्या डबेवाल्यांनी स्वीकार केला. डबेवाल्यांनी सुरु केलेली ही मोहीम गेली 2 वर्षं सुरु आहे. दरदिवशी रोटी बँकेला जवळपास 20 ते 25 फोन येतात, शनिवारी आणि रविवारी हा आकडा जवळपास 50 च्या घरात जातो. दररोज 300 लोकांची तर शनिवार रविवारी जवळपास 600 गरजू उपाशी लोकांची भूक या रोटी बँकेच्या माध्यमातून भागवली जाते.

 

 

रोटी बँकेच्या या कामासाठी डबेवाले सायकलींचा वापर करत होते, मात्र सायकलने जेवणाचे वाटप करण्यात अडचणी येत होत्या. माजी पोलिस महासंचालक डी शिवानंदन यांनी तीन गाड्या पुरवल्याने रोटी बँकेचे काम आता सुकर होणार आहे. या गाड्या प्रामुख्याने दक्षिण मुंबई, मुंबई पूर्व उपनगर, मुंबई पश्चिम उपनगरात कार्यरत असतील. या गाड्यांवर काम करण्यासाठी स्वयंसेवकही असणार आहेत, जे प्रामुख्याने सायंकाळी 4 ते रात्री 12 या वेळेत काम करणार आहेत.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...