आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूबाबत संशय: पोलिसांनी हॉटेलचा मजला केला सील, दोन दिवस श्रीदेवी खोलीच्या बाहेरच नव्हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई/ मुंबई- पौर्णिमेच्या ५ दिवस आधीच अमावस्या आली. शनिवारी मध्यरात्री फिल्मी जगताची ‘चांदणी’ मावळली. श्रीदेवींना पाहताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकायचा. अशा या ‘चंद्रमुखी’च्या हृदयाची धडकन दुबईत मध्यरात्री थांबली. जीवनात काही ‘लम्हे’ असे येतात की कुणाची ‘जुदाई’ मन पिळवटून टाकणारा ‘सदमा’ देऊन जाते. या ‘रुप की राणी’चे हे आकस्मिक जाणे असेच चटका लावणारे आहे. गेल्या वर्षीच श्रीदेवींनी चित्रपटाच्या कारकीर्दीत ५० वर्षे पूर्ण झाली होती आणि ५४ व्या वर्षी त्यांनी जीवनातूनच निरोप घेतला. सोमवारी अंत्यसंस्कार होऊ शकतात.


पोलिसांनी हॉटेलचा मजला सील केला, दोन दिवस श्रीदेवी खोलीच्या बाहेरच नव्हत्या
स्थानिक मीडियानुसार, पती आणि मुलगी मुंबईला परतल्यानंतर श्रीदेवी दुबईमधील हॉटेलच्या खोलीत एकट्याच होत्या. निधनापूर्वी ४८ तास त्या बाहेर आल्या नव्हत्या. शनिवारी रात्री बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत दिसल्यावर त्यांना रुग्णालयात हलवले. दुबई पोलिसांनी तपासासाठी हॉटेलचा पूर्ण मजला सील केला आहे.

 

- कुटुंबीयांनुसार श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास नव्हता. या स्थितीत कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचा मृत्यूशी संबंध जोडला जात आहे.
- श्रीदेवींनी २९ शस्त्रक्रिया केल्या आहेत. यात एकात त्रास झाला तेव्हापासून डाएटच्या गोळ्या आणि अँटी एजिंग औषधे घेत होती.
- न्यायवैद्यक अहवालानंतरच पार्थिव कुटुंबास सोपवले जाईल. सोमवारी सकाळी १० पूर्वी ते शक्य नाही.
- शवविच्छेदन आणि इतर अहवालात संशयित काही सापडले तर आणखी बराच वेळ लागू शकतो.

 

कुटुंबाला मोठा धक्का 

श्रीदेवी यांना ह्दयविकाराचा त्रास जाणवत नव्हता. श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे, असे बोनी कपूर यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता संजय कपूर यांनी म्हटले आहे. मोहित मारवाह यांच्या विवाह समारंभात श्रीदेवी यांचे आरोग्य उत्तम असल्याचेच वाटत होते. या समारंभास श्रीदेवी या पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी सोबत उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने अनेकांना धक्का बसला. रात्री अकराच्या सुमारास श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

वाचा संबंधीत बातम्या...

मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत आणण्यात येईल श्रीदेवी याचे पार्थिव

श्रीदेवीला हृदयविकाराचा त्रास नव्हता, कपूर कुटुंबियांसाठी धक्का पचवणे अवघड: संजय कपूर

..नसता अखेरच्या क्षणी एकटीच असती श्रीदेवी, यामुळे सोबत होते बोनी कपूर आणि खुशी

नकोसा योगायोग : श्रीदेवींच्या 'हिम्मतवाला'ला आजच पूर्ण झालीत 35 वर्षे

 

श्रीदेवीला श्रद्धांजली देत काँग्रेसने म्हटले असे काही, फॅन्स भडकले; Delete केले ट्वीट

 

 

पुढील स्लाईडवर पाहा संबंधीत फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...