आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर राज ठाकरे यांनाच सेनेत घ्या! नाराज जुन्या शिवसैनिकांची फलकाद्वारे जाहीररीत्या टाेलेबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डोळ्यासमोर निवडणुका दिसू लागल्याने अनेक पक्षांत आयारामांची संख्या वाढत अाहे.  जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोडून अायात लाेकांना पदे देण्यास सुरुवात झाल्याने शिवसेनेत नाराजी वाढू लागली अाहे. मनसेतून आयात केलेल्या शिवाजी कदम यांना घाटकोपर येथील शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख करण्यात आले. त्यामुळे जुने शिवसैनिक संतप्त झाले, दाेन गटांत हाणामारीही झाली. अाता या नाराज शिवसैनिकांनी अापल्या विभागात फलक लावून ‘नवनिर्माण शिवसेना’ अशा शब्दांत अापल्या पक्षाची हेटाळणी केली अाहे. तसेच ‘अाता राज ठाकरे यांनाच पक्षात घ्या’ अशी उपहासात्मक मागणीही त्यावर केली अाहे.   


शिवाजी कदम यांनी गेल्या वर्षी मनसेतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केला होता. नवीन नियुक्त्यांमध्ये त्यांच्यासह मनसेतून अालेल्या अनेकांना पदे वाटण्यात आली. शाखा क्रमांक १२९ चे प्रमुखपद कदम यांना देण्यात आले. त्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेले प्रदीप मांडवकर नाराज झाले. त्यानंतर शिवसैनिकांनी पोस्टर्स लावली. यात आयात केलेल्यांना वाटण्यात आलेल्या पदांची माहिती देण्यात आली आहे, तर दुसऱ्या पोस्टरवर ‘शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाहीत. त्यामुळे राज यांच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाची पदे वाटण्यात आली आहेत,’ असा उल्लेख अाहे. तसेच  त्याऐवजी राज यांनाच शिवसेनेत का घेत नाही, असा प्रश्न विचारला आहे. शिवसेनेत निष्ठावंत नकोत तर चार पक्ष फिरून येणारे हवेत, मग आपणही चार घरं फिरून येऊया,’ असेही उपहासाने नमूद करत पक्ष साेडण्याचा इशारा दिला अाहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...