आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रीकरांना लिलावतीतून डिस्चार्ज: गोवा विधानसभेत स्वत: सादर केला अर्थसंकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्रीकर यांची प्रकृती ठणठणीत असल्याने  त्यांनी स्वत: आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. - Divya Marathi
पर्रीकर यांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांनी स्वत: आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरूवारी सकाळी मुंबईतील लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच पर्रीकर गोव्याकडे रवाना झाले. राजधानी पणजीत पोहचताच ते गोवा विधानसभेत हजर झाले व तेथे स्वत: राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, त्यांनी एक निवेदन जारी करत सर्वांचे आभार मानले आहेत.

 

मनोहर पर्रीकरांवर मागील आठ दिवसापासून मुंबईतील लिलावती रूग्णालयात पोटदुखीच्या त्रास झाल्याने दाखल झाले होते. मात्र, त्यांना स्वादुपिंडाचा आजार असल्याचे समोर आले. त्यामुळे गेली आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. याबाबत त्यांच्या आरोग्याच्या विविध तपासणी करण्यात आल्या. पर्रीकरांचा हा आजार गंभीर असल्याचे बोलले गेले. मात्र, रूग्णालयाने त्याचे खंडन केले होते. 

 

दरम्यान, रविवारी मुंबई दौ-यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिलावतीत जाऊन पर्रीकरांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. सोबत पर्रीकरांच्या तब्बेतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवली आहे. 

 

पर्रीकरांच्या उपचारासाठी गरज भासल्यास अमेरिकेत तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करणे किंवा अमेरिकेत उपचारासाठी नेण्याची आवश्यकता असल्यास सर्व प्रकारची तयारी भाजप व केंद्र सरकारने केली आहे. मात्र, सध्या पर्रीकरांची तब्बेत ठीक आहे त्यामुळेच लिलावतीतून त्यांना तात्पुरता डिस्चार्ज दिला गेला. आज दुपारी त्यांनी गोवा विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मनोहर पर्रीकरांनी मानले आभार, जारी केले स्टेटमेंट....

बातम्या आणखी आहेत...