आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, उत्तर भारतीय पर्यटक पृथ्वीवर असलेली घाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्यातील मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीयांवर टीका केली आहे. - Divya Marathi
गोव्यातील मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीयांवर टीका केली आहे.

मुंबई- गोव्याचे शहरी आणि नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर भारतीय पर्यटक हे पृथ्वीवर असलेली घाण आहेत असे मत व्यक्त करतानाच ते गोव्याला हरियाणा बनवू इच्छित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सरदेसाई हे गोवा फॉर्वड पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते भाजपच्या सत्तारुढ आघाडीत सामील आहेत. 

 

 

अजून काय म्हणाले सरदेसाई
- सरदेसाई म्हणाले की, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लोकसंख्येच्या सहा पट अधिक आहे. हे पर्यटक पृथ्वीवर असलेली घाण आहेत.
- उत्तर भारतीय पर्यटक हे पुरासारखे आहेत. आम्हाला गोव्याला दुसरे गुरुग्राम बनवायचे नाही. गोव्यात असणाऱ्या प्रश्नांसाठी उत्तर भारतीय जबाबदार आहेत. येथे येणारे हे पर्यटक गोव्यात हरियाणा बनवू इच्छित आहेत.

 

 

कडक कायद्यांची गरज
- उत्तर भारतीय पर्यटकांवर टीका करताना त्यांनी पर्यटन धोरणावरही टीका केली. सरकार धोरणामुळेच राज्य हे 1.2 कोटी पर्यटक येतात. उत्तर भारतीयांच्या अस्वच्छ वर्तनामुळे आणि घाणेरड्या सवयींमुळे गोव्यात समस्या उभ्या राहत आहेत. 

- गोव्यात या पर्यटकांच्या वाढत्या संख्येने कचऱ्याची समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे अशा कायद्याची गरज आहे जे या पर्यटकांना नियंत्रित करतील विशेषत: त्यांनी स्वच्छतेच्या सवयी लावतील. यात त्यांच्याकडून अधिक कर घेणे, दंड ठोठावणे अशा उपायांचा समावेश आहे. 

 

 

काय दिले स्पष्टीकरण
- सरदेसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, दिल्ली, हरियाणा, गुरुग्राम येथून येणाऱ्यांची एक प्रवृत्ती आहे. ते सगळे काही हडप करु इच्छितात. गोव्यात राहण्याची पध्दत जरा वेगळी आहे. 50 वर्षांपुर्वी आम्ही एक युध्द लढले आहे. आम्ही आता एक वेगळे युध्द लढत आहोत. हे युध्द पर्यावरण रक्षणाचे आहे. हे पर्यटक पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. येथे येथून काही जण प्लॉट खरेदी करत असून इमारती उभारत आहेत. यापूर्वी गोव्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य दिले होते. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...