आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनं 32 हजारी: दिवाळीपर्यंत सोनं 34 हजारांवर जाणार, गुंतवणूकीचा नवा पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- या वर्षी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव दहा ग्रॅमला 34 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे विविध देशांत सोन्याचा भाव सध्याच्या भावापेक्षा 2 हजार रुपयांनी वाढू शकतो. शनिवारी स्थानिक बाजारपेठेत सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 32,050 वर पोहचला. तर, न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी हा भाव 0.17 टक्क्यांनी वाढून 1,299 डॉलर प्रति औंस राहिला. 

 

कॉमट्रेंड्झ रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांच्या मते, दिवाळीपर्यंत सोने 30 हजारवरून 34 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. आगामी काळात महागाईचा दर वाढला तर व्याजदरही वाढतील. त्यामुळे लोकांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढेल. सोन्याची मागणी वाढेल. दुसरीकडे रुपयाचे मूल्य घसरत असल्याने सोने दिवाळीपर्यंत विक्रमी पातळी गाठू शकते. 

 

भाव 30, 500 रुपयांपर्यंत-

 

एंजल ब्राोकिंगचे प्रथमेश मलय यांच्या मते अमेरिकेत व्याज दर वाढण्याची शक्यता पाहता साेने 30, 500 रुपये राहू शकते. 

बातम्या आणखी आहेत...