आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी, पेट्रोल-डिझेलमुळे राज्यांच्या उत्पन्नात ३७,४२६ कोटी रुपयांची झाली वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये जास्त कर संकलन झाल्याने राज्यांना या वर्षी अतिरिक्त ३७,४२६ कोटी रुपयांची कमाई होणार आहे. दुसरीकडे, राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या बेस प्राइसवर व्हॅट वसूल केला तर त्यांना ३४,६२७ कोटी रुपयांचे नुकसान होईल. म्हणजेच राज्यांचे अतिरिक्त उत्पन्न या नुकसानीपेक्षा जास्त आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये राज्य तेलाच्या बेस प्राइसवर उत्पादन शुल्क अाणि डीलरच्या कमिशनवर व्हॅट वसूल करतात.  


एसबीआय रिसर्चच्या वतीने शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. जीएसटी लागू करताना राज्यांचे उत्पन्न दरवर्षी १४ टक्क्यांनी वाढणार असल्याचे गृहीत धरण्यात आले होते. याच आधारावर राज्यांना पाच वर्षांपर्यंत भरपाई देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र, अहवालानुसार १६ राज्यांमध्ये महसूल वाढ १४ टक्क्यांपेक्षाही जास्त नोंदवण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्यांच्या कर महसुलात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांच्या महसुलामध्ये घसरण झाली आहे.  जीएसटीमुळे २०१७-१८ मध्ये राज्यांना १८,६९८ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने १८,७२८ कोटी रुपये जास्त आले आहेत. अशा प्रकारे पूर्ण आर्थिक वर्षात कमीत कमी ३७,४२६ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न झाल्याचा 
अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...