Home | Maharashtra | Mumbai | hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

गारपिटीचा 11 जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरला फटका: कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 12, 2018, 08:49 PM IST

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावां

 • hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

  मुंबई- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे म्हटले आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.

  गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे आणि काढणी झालेल्या मालाचे मोठे नुकसान झालं आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.

  पुढील स्लाईडवर वेगवेगळ्या जिल्ह्यातील नुकसानीची माहिती आणि फोटो

 • hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

  बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील 42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळ पिके, भाजीपाला यांचा समावेश आहे.

 • hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

  जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

 • hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

  परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील 59 गावातील 2 हजार 679 क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे.

 • hailstorm hit 1 lakh 24 thousand hectares in 11 districts says agircultural minister pundkar

  उमरगा आणि उस्मानाबाद या दोन तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि औंढा या दोन तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Trending