आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - टीम इंडियातील फिरकिपटू हरभजनसिंह गुरुवारी रात्री मुंबईत विशाल करियाला पोहचण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. पण मीडियाला याबाबत आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे करियाच्या घराबाहेर मीडिया पाहून हरभजन कारमधून खाली उतरलाच नाही. अखेर विशाल करियाला न भेटताच तो आल्यापावली परतला. विशाल करियाला कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना लपण्यासाठी मदत केल्याच्या आरोपात अटक झाली होती.
विशाल करिया याचे भारतीय क्रिकेट संघाचील क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरही संबंध आहेत. हरभजनबरोबरही त्याची मैत्री बरीच जुनी आहे. त्यामुळेच हरभजन त्याला भेटण्यासाठी गेला होता. पण हरभजन आधीच काही माध्यमांचे प्रतिनिधी त्याठिकाणी उपस्थित होते. माध्यमांचे कॅमेरे आणि प्रतिनिधी पाहून हरभजन कारच्या खालीच उतरला नाही. उलट त्याने लपण्याचा प्रयत्न केला. पण माध्यमांच्या कॅमेऱ्यांच्या नजरेतून तो सुटला नाही.
कोण आहे विशाल करिया
भारतीय क्रिकेटपटुंच्या बरोबर विशाल करियाचे काही फोटोही आधी समोर आलेले आहेत. भज्जीबरोबरही त्याची मैत्री आहे. विशाल करिया हा बुकी असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. पण त्याच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. कमला मिल आग प्रकरणात आरोपींना फरार होण्यासाठी आणि लपवण्यासाठी आरोप लागल्याने विशाल करियाला अटक झाली होती. त्यानंतर जामीनावर त्याची सुटका झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.