आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेल काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडियाचा गुरू, आज मुंबईत मार्गदर्शन करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातचा युवा नेता हार्दिक पटेल मुंबई काँग्रेसच्या सोशल मिडिया टीमचा गुरू बनणार आहे. मुंबई काँग्रेसने आपल्या सोशल मिडिया टीमला प्रभावी करण्यासाठी हार्दिक पटेलच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आज सायंकाळी वाद्र्यातील रंगशारदा सभागृहात हार्दिक पटेल मुंबई काँग्रेसच्या सोशल मिडियात टीमला भारतीय जनता पक्ष व मोदी-शहांच्या खोट्या प्रचाराला उत्तरे कशी द्यायची याचा गुरूमंत्र देणार आहे. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम उपस्थित राहतील.

 

हार्दिक पटेल हा गुजरातमधील पाटीदार अमानत आंदोलन समितीचा नेता आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिकने फक्त रस्त्यावर उतरूनच नव्हे तर सोशल मिडियाद्वारेही सत्ताधारी भाजप सरकारची हवा काढली होती. गुजरातमध्ये निवडणुकीदरम्यान 'विकास गांडो थयो छे' म्हणजेच विकास वेडा झालाय ही टॅगलाईन हार्दिक पटेलच्या आयटी सेलने पुढे आणली होती. हीच टॅगलाईन गुजरातमध्ये विरोधी पक्षाच्या प्रचाराची थीम बनली.

 

आता महाराष्ट्रात वर्ष-दीड वर्षावर लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपमधील मंडळी राज्यातील लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्याचा विचार करत आहे. त्यामुळे काँग्रेसने सोशल मिडियाचे महत्त्व लक्षात घेता त्याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी काँग्रेसने राज्य, जिल्हा, ब्लॉक स्तरावर सुद्धा सोशल मिडिया टीम तयार केल्या आहेत. 

 

काँग्रेस आगामी निवडणुकीत फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सअॅपद्वारे आपला आवाज जनतेपर्यंत पोहचविणार आहे. काँग्रेसने 2019 साठी सोशल मिडियावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याला माहित असेलच की, भाजप व मोदींनी 2014 ची सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सोशल मिडियाद्वारेच गाजवली. तेव्हा काँग्रेस सोशल मिडियाबाबत गाफिल राहिली मात्र आता त्यांना सोशल मिडियाचे महत्त्व व ताकद कळाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...