आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 प्रवासी असलेले हेलिकॉप्टर कोसळले, डहाणूजवळ समुद्रात आढळले अवशेष, 3 मृतदेह सापडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सकाळी 10.30 च्या सुमारास एअर ट्राफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 7 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. डहाणूजवळ समुद्रामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष  आढळून आले आहेत. कोस्ट गार्ड बचावकार्य करत असून तीन मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती एएनआयने दिली आहे. इतर चार जणांचा शोध सध्या सुरू आहे. 

 

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे पवन हंसचे हे हेलिकॉप्टर सकाळी साडेदहाच्या सुमारास ओएनजीसीच्या समुद्रातील तेल केंद्राकडे निघाले होते. पण ठरलेल्या वेळेत ते तेल केंद्रावर पोहोचलेच नाही. विमानामध्ये दोन पायलट आणि ओएनजीसीचे पाच कर्मचारी होते. 

मुंबईपासून 30 एअरोनॉटिकल माईल अंतरावर या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर कोस्ट गार्डला विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती दिली. त्यांनी जवळपास तीन ते चार तास शोध घेतल्यानंतर विमानाचे अवशेष आढळले.  हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सात जणांचा शोध घेणे सध्या सुरू आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...