आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतल्या नरीमन पाँईंट येथील तरंगत्या हॉटेलला हायकोर्टाने नाकारली परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मरिन ड्राईव्हच्या समुद्रातील प्रस्तावित तरंगत्या हॉटेलची परवानगी नाकारत मुंबई हायकोर्टाने हायहेरीटेज कमिटीचा निर्णय योग्य ठरवला आहे. मुंबईच्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे कोर्टाने हा न‍िर्णय देताना म्हटले आहे.

 

सुरक्षेच्या मुद्यावर कोर्टाने ठेवले बोट... 
मरीन ड्राईव्ह परिसरात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. शिवाय नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने परवानगी देताना सुरक्षेच्या मुद्यावरही बोट ठेवले होते, याचा उल्लेख हायकोर्टाने हा निर्णय देताना केला आहे.

 

एमएमआरडीए, तटरक्षक दलाकडून परवानगी...

पर्यटन विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळद्वारा (एमटीडीसी) प्रस्तावित या हॉटेलकरता एमएमआरडीए, तटरक्षक दल, पश्चिम नौदल मुख्यालय या सर्वांची परवानगी आहे. परंतु 2015 मध्ये स्थापन करण्‍यात आलेल्या हेरीटेज कमिटीने यावर आक्षेप नोंदवला होता. हेरीटेज कमिटीला आव्हान देण्यासाठी हॉटेलचे विकासक रश्मी डेव्हलपर्सने हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने हेरीटेज कमिटीचा निर्णय योग्य ठरवला. तसेच सागरी किनाऱ्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचेही मत कोर्टाने यावेळी नोंदवले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...