आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टात 10 वर्षापेक्षा जुन्या 6 लाख केस पेंडिंग, मुंबई हायकोर्टात त्यापैकी 1 लाखाहून अधिक प्रकरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशभरातील हायकोर्टात 10 वर्षापेक्षा जुन्या 6 लाख केस पेंडिंग असून मुंबई हायकोर्टात त्यापैकी 1 लाखाहून अधिक प्रकरणे असल्याचे समोर आले आहे. देशभरातील 24 पैकी 20 हायकोर्टातील आकडेवारीनुसार मुंबईपाठोपाठ पंजाब, हरियाणा हायकोर्टाचा नंबर येतो. 2016 च्या अंतिम कालावधीत एकत्रित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील 24 हायकोर्टांमध्ये एकुण 40.15 लाख केस पेडिंग आहेत. यापैकी 19.45 केस या दहा वर्षापेक्षा अधिक जुन्या आहेत.

 

मुंबई, पंजाब आणि हरियाणा आणि कोलकत्ता हायकोर्टात सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित
- यासंदर्भातील राष्ट्रीय आकडेवारीनुसार देशभरातील 20 हायकोर्टात 10 वर्षाहून जुनी सुमारे 5,97,650 प्रकरणांवर सुनावणी सुरु आहे. 

- अलाहाबाद आणि अन्य तीन कोर्टातील माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 
- सर्वाधिक 1,29,063 प्रकरणांसह मुंबई हायकोर्ट या यादीत टॉपवर आहे. यात 96,546 दिवाणी, 12846 फौजदारी आणि 19621 याचिका आहेत.  

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...