आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हांच्या बंगल्यावर हातोडा; मनपाने दिलेल्या नोटिसीकडे केले होते दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुहू भागातील ‘रामायण’ या बंगल्यातील अनधिकृत  बांधकामाविरोधात मुंबई महापालिकेने सोमवारी कारवाई केली.  या ठिकाणी छतावर आणि तळमजल्यावर त्यांनी विनापरवानगी स्वच्छतागृह आणि छाेटेसे मंदिर तयार केले होते. यामुळे पालिकेने त्यांना दोनदा नोटीस बजावली होती. पण नोटिसीला उत्तर न मिळाल्याने पालिकेच्या पथकाने अनधिकृत बांधकाम पाडले.


या इमारतीमध्ये शत्रुघ्न पत्नी आणि मुलगी सोनाक्षी यांच्यासह राहतात. कारवाई सुरू असताना सिन्हा बंगल्यातच होते. जुहूच्या जेव्हीपीडी स्कीममध्ये ५ नंबर रोडवर हा बंगला आहे. या ठिकाणी एका मजल्यावर अनधिकृत स्वच्छतागृह, पँट्री आणि मोकळ्या जागेत कार्यालय आणि छोटेसे मंदिर तयार करण्यात आले होते. मनपाची परवानगी न घेता गॅलरीमध्ये पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. तसेच बंगल्याच्या सर्व मजल्यांवर अनधिकृत बांधकाम केले होते. सोमवारी सकाळी हे बांधकाम पाडण्यात आले. 


सत्य बोलण्याची शिक्षा  
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, बंगल्यामध्ये अत्यंत किरकोळ अतिक्रमण होते. पालिकेने ते हटवण्यास सांगितले होते. एकीकडे सरकार स्वच्छतागृह बनवण्याचे अभियान राबवत आहे, तर दुसरीकडे तोडत आहे. माझा या कारवाईवर काहीही आक्षेप नाही.  मात्र, गेल्या काही दिवसांत मी सरकारविरोधात सत्य बोलत आहे, त्याची मला शिक्षा मिळत आहे.

 

पुढे पाहा, संबंधित PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...