आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांच्या सौदागरांमुळे तिहेरी तलाक विधेयक रखडले, गिरीराज सिंग यांचा पवारांवर पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मतांच्या सौदागरांमुळे तिहेरी तलाक विधेयक संमत होण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे, असे भाजप खासदार गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिशेने त्यांचा रोख होता. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

 


शरद पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत तिहेरी तलाकचे समर्थन केले होते. तिहेरी तलाक हा कुराणचा संदेश आहे, तो बदलण्याचा अधिकार राजकारण्यांना नाही, असे वक्तव्य पवारांनी केले होते. यावर भाजपचे खासदार गिरीराज सिंग यांनी शरद पवारांना मतांचे सौदागर, असे म्हटले आहे.

''जवळपास 22 मुस्लीम देशात तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आली आहे. भारतात मतांचे सौदागर तलाकच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठा अडथळा आहेत. लोकसभेप्रमाणे काँग्रेससह इतर पक्षांनी राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्यावा. अन्यथा त्यांची दुतोंडी भूमिका जगासमोर येईल,'' असे गिरीराज सिंग म्हणाले.तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्यात केंद्र सरकारला यश आले. मात्र हे विधेयक राज्यसभेत अडकले आहे. लोकसभेत पाठिंबा दिलेल्या काँग्रेसनेही राज्यसभेत तिहेरी तलाकला विरोध केला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...