आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- देशातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध असलेली रजनी पंडित अटकप्रकरणी बुधवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. संतोष पंडगळे (34) आणि प्रशांत सोनावणे (34) अशी त्यांची नावे असून, त्यांना नवी मुंबईतून अटक केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत रजनीसह एकून पाच लोकांना अटक झाली आहे. रजनीवर आपल्या क्लाईंटसाठी चुकीच्या पद्धतीने कॉल डिटेल रिकॉर्ड्स (सीडीआर) प्राप्त करणे, अवैधरित्याने सोर्सिंग आणि सीडीआर विकण्याचा गंभीर आरोप लावला आहे. रजनी पंडितला लेडी जेम्स बॉन्ड नावाने ओळखले जाते. रजनीच्या माहितीनुसार, तिने आतापर्यंत 75 हजारांहून अधिक जास्त केस सॉल्व केल्या आहेत. यामुळे अटक झाली रजनीला...
- ठाण्यात राहणारी रजनी (54) माजी पोलिस अधिका-याची मुलगी आहे. पोलिसांनी समरेश झा नावाच्या एका गुप्तहेराला अटक केल्यानंतर तिला पोलिसांनी घरातून अटक केली.
- समरेशने पोलिसांना सांगितले की, तो हे कॉल डिटेल्स रजनीच्या सांगण्यावरून देत होता व त्याबदल्यात मोठी रक्कम वसूल करत होता.
- ठाणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रजनीवर पाच लोकांचा सीडीआर जमा करणे आणि त्या बदल्यात मोठी रक्कम वसूल करण्याचा आरोप आहे.
25 वर्षात 75 हजार केसेस केल्या सॉल्व-
- रजनीचा जन्म ठाण्यात झाला. रजनीने मुंबईत मराठी साहित्यात पदवी घेतली आहे.
- रजनीचे पिता सीआयडीमध्ये होते. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणात त्यांनी काम केले होते.
- रजनी पंडितने मागील 25 वर्षापासून 75, 000 अधिक प्रकरणे सोडविल्याचे तिचे म्हणणे आहे.
- ती भारतातील पहिला महिला गुप्तहेर आहे. तिला देशातील वुमन जेम्स बॉन्ड सुद्धा म्हटले जाते.
एका मैत्रिणीमुळे बनली गुप्तहेर-
- एका इंटरव्यूमध्ये रजनीने म्हटले होते की, जेव्हा मी कॉलेजात होती तेव्हा आमची एका मैत्रिण चुकीच्या मार्गाने जाताना पाहिले.
- ती सिगरेट, दारू पिऊ लागली सोबत चुकीच्या लोकांसोबत राहू लागली. मी डिसाईड केले की, तिच्या घरच्यांना ही बाब सांगितली पाहिजे.
- यासाठी मी ऑफिसमधून तिला गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने पत्ता घेतला व तिच्या घरी पोहचले.
- मी जेव्हा तिच्या घरी पोहचले व सर्व बाब सांगितली तेव्हा त्यांनी मला विचारले की, काय तू गुप्तहेर आहे काय? त्याच दिवशी मी ठरवले की, मला पुढे काय करायचे ते.
- आज त्याचाच हा परिणाम आहे की, 'रजनी पंडित डिटेक्टिव सर्विसेज' नावाची तिची गुप्तहेर (जासूसी फर्म) संस्था आहे. तिच्या डिटेक्टिव एजन्सी टीममध्ये 20 लोकांची टीम आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रजनी पंडितचे आणखी काही फोटोज......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.