आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'करंज' पाणबुडीमुळे वाढली भारतीय नौदलाची ताकद, जाणून घ्या इंडियन नेव्हीबाबत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे 31 जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधून जलावतरण करण्यात आले. - Divya Marathi
स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे 31 जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधून जलावतरण करण्यात आले.

मुंबई- प्रोजेक्ट 75 या कार्यक्रमांतर्गत भारतीय नौदलात एकूण 6 पाणबुड्या सामील होणार आहेत. त्यातील एक स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे 31 जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधून जलावतरण करण्यात आले. याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस 'कलवरी'चे जलावतरण दीड महिन्यापूर्वी 14 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. सोबतच दुसरी 'खांदेरी' देखील कार्यरत आहे. त्यामुळे आज आम्ही आमच्या वाचकासाठी घेऊन आलो आहोत करंज पाणबुडीबाबत आणि भारतीय नौदलाबाबतची माहिती....

 

करंज, कलावरीसह सहा पाणबुड्या बनवतोय भारत-

 

- भारताने करंज, कलवरीसारख्या एकून सहा अणुऊर्जायुक्त पाणबुड्यांचे उत्पादन ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत सुरू केले आहे.
- करंज, कलवरी पाणबुडीसारख्या एकून सहा स्कॉर्पिन पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये फ्रान्सच्या साहाय्याने तयार होत आहेत.
- हे प्रकल्प- 75 चे काम ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत सुरू आहे व एकूण खर्च 23,653 कोटी होणार आहे. 
- ‘आयएनएस खंदेरी’ पाणबुडी 2018 सालच्या मध्यात, तिसरी ‘करंज’ 2-19 मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. तर, बाकीच्या पाणबुड्या 2020-21 मध्ये तयार होणार आहेत.
- भारतीय नौदलातील पूर्वीची कमतरता नष्ट करून नौदल लवकरच अधिक शक्तिशाली होत आहे. 
- गेल्या 17 वर्षांत भारतीय नौदलात एकही पाणबुडी दाखल झाली नव्हती. सेवेत असलेल्या काही पाणबुड्या निवृत्त, तर काही जुन्या होऊन जर्जर झाल्या आहेत. त्यामुळे या पाणबुड्यांचे महत्त्व कित्येक पटीने आहे.

 

काय आहे करंजची वैशिष्ट्ये-

 

- स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी असलेल्या करंजची निर्मिती स्वदेशी म्हणजेच मेक इन इंडियातंर्गत करण्यात आली आहे.
- करंजची ऊंची 12.5 मीटर तर 67.5 मीटर लांबी आहे तर करंजचे एकून वजन 1567 टन इतके आहे.
- जलतीर (Torpedo) आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्र (antiship missile) यांनी देखील हल्ले करू शकते.
- युद्धामध्ये सर्व अडचणींवर मात करत शत्रूला चकमा देत सहज आणि सुरक्षितपणे बाहेर येण्याची क्षमता आहे.
- जमिनीवरही सहजरणे हल्ला करण्यास सक्षम आहे. तसेच पाणबुडीवरील ऑक्सिजन संपल्यास ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. त्यामुळे करंज पाण्याखाली दीर्घकाळ राहू शकते.
- सर्व प्रकारची युद्धे, पाणबुडी विरोधी युद्ध आणि गुप्तचर कामांमध्ये वापरांसाठी सक्षम आहे करंज पाणबुडी.
- करंज कोणत्याही रडाच्या तावडीत सापडणार नाही अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे.


पुढे स्‍लाईड्सद्वारे जाणून घ्‍या, भारतीय नौदलाचा इतिहास, ताकद या विषयी...

बातम्या आणखी आहेत...