आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील चॅम्पियन्स ट्राॅफी, वर्ल्डकप काढून घेणार? विश्वचषक स्पर्धेच्या करमाफीवरून वाढलेली तेढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये भारत सरकारच्या कर धोरणामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१६च्या भारतात झालेल्या  टी-२० विश्वचषक स्पर्धेचा करमाफी वरून वाढलेली तेढ सध्या वाढली असून त्याचे पर्यावसान, आयसीसीकडून भारतात होणाऱ्या, २०२१ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात होऊ शकते. आयसीसीने अशी टोकाची भूमिका घेतल्यास, ‘मेंबर्स पार्टिसिपेशन अॅग्रीमेंट’ (एमपीए) हा करार बीसीसीआयकडून रद्द केला जाऊ शकतो. त्यामध्ये आयसीसीचेच अधिक नुकसान होऊ शकते. सध्या क्रिकेट मैदानावर आणि आर्थिक आघाडीवर भारतीय क्रिकेटचेच अधिराज्य असल्यामुळे आयसीसी असे करण्यास धजावणार नाही असे देखील म्हटले जात आहे.


२०१६ साली भारतात झालेली टी-२० विश्वचषक स्पर्धा ही या वादाचे मूळ आहे. याआधी म्हणजे २००६च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी व २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी ‘युपीए’ सरकारने या दोन स्पर्धांमधील आयसीसीच्या नफ्यावर कर आकारला नव्हता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावेळी अर्थमंत्रीपद सांभाळणारे चिदम्बरम यांचा विरोध मोडून या स्पर्धा करमुक्त केल्या होत्या. मनमोहन सिंग यांनी भूमिका घेतली होती की, आपण जर जागतिक स्पर्धा आयोजनासाठी त्यांच्याकडून कर घेतला जर जागतिक दर्जाच्या स्पर्धा आपल्या देशात कश्या भरविणार?


अलिकडेच बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, शरद पवार यांनी राज्यसभेत, केंद्रित अर्थमंत्री अरुण जेटली यांना प्रश्न विचारला होता, की बीसीसीआयने भारतातील अन्य खेळांना ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. ती मदत खरं तर करमुक्त असायला हवी होती. मात्र त्या रक्कमेवरही  कर लावला आहे.

 

कपातीमुळे नफ्यावर परिणाम
गत विश्वचषकदरम्यानही आयसीसीला भारताचे करधोरण तसेच अपेक्षीत होते. उलट केंद्र सरकारने ‘स्टार’कडून थेट १० टक्के कराची रक्कम कापून घेतली.  १२५ कोटी रुपयांच्या घरात जाणारी ती रक्कम कापली गेल्यामुळे आयसीसीच्या सर्व सदस्य देशांच्या नफ्याच्या हिश्श्यावरही परिणाम झाला होता.


करमुक्त धाेरण सर्वच देशात
जगात स्पर्धांसाठी करमुक्त धोरण सर्वच यजमान देश अवलंबतात. असे असताना विद्यमान भारत सरकार याउलट भूमिका घेत असल्याबद्दल आयसीसीकडून भारतात आगामी विश्वचषक किंवा तत्सम स्पर्धा भरवू नयेत अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...