आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांच्या शेतात धाडसी चोरी, 170 शेळ्या चोरल्या; सोशल मीडियावर व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नागपूर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतात धाडसी चोरी झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. शेतातून 170 शेळ्या चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

मूल शहरातील कुरमार मोहल्ल्यातील कंकलवार बंधुच्या 170 शेळ्या चोरीला गेल्या आहेत. या शेळ्याची किंमत साडेसहा लाख रुपये सांगितले जात आहे. हे शेत देवेंद्र फडणवीस यांचे वडिलोपार्जित आहे. पोचू बिरा कटकेलवार याने नेहमीप्रमाणे दिवाकर कटकेलवार आणि सुखदेव कंकलवार यांच्या एकूण 170 शेळ्या-मेंढ्या काल (बुधवार) सकाळी चारण्यासाठी नेल्या होत्या. सायंकाळ होताच त्या शेळ्या आणि मेंढ्या कटकेलवारने त्याच्या घरापासून जवळच असलेल्या फडणवीस यांच्या शेतातील जाळीमध्ये बंदिस्त केल्या होत्या. सर्व शेळ्या रात्री 10 वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी त्या शेळ्यांचा शोध घेतला परंतु  शेळ्या कुठेच दिसल्या नाही.

 

मुख्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही...
- ती जागा शोभाताई फडणवीस यांच्या नावे आहे.
- त्या जागेवर कुणी खासगी व्यक्ती शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहे.
- त्याने शेळी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे, चोरीची नाही. ही तक्रार सुद्धा जुनी आहे.
- या व्यक्तीचा किंवा त्या जागेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही संबंध नाही.

बातम्या आणखी आहेत...