आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळीला नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू; बहीण थोडक्यात बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंघोळीला गेलेल्या सख्ख्या भावंडांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवत गोठणे गावात घडली आहे. रविवारी दुपारी बारा वाजता घडलेल्या या घटनेमुळे आचरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

सूत्रांनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गोठणे गावात राहाणारे तीन सख्खे भावंडे कोंड नदीवर अंघोळीला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने सुवर्णा दशरथ आचरेकर (23)  आणि आकाश दशरथ आचरेकर (19) यांचा बुडून मृत्यू झाला तर  दीपाली दशरथ आचरेकरला (22) हिला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...