आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमध्ये कार झाडाला धडकून भीषण अपघात; 5 जणांचा जागेवर मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर- माहीम मार्गावरील पाटीलवाडी येथे भरधाव कार वडाच्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागेवर मृत्यू झाला. आज (बुधवार) पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

 

अपघातात किरण परशुराम पागधरे (वय- 30, रा. वडराई), निकेश मोहन तामोरे (वय- 29, रा. तारापूर), संतोष वामन बहिराम (वय- 37, रा. खाणपाडा), दिपेश रघुनाथ पागधरे (वय-25, रा. सातपाटी) चालक विराज अर्जुन वेताळ (वय-25, रा.पालघर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो

बातम्या आणखी आहेत...