आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर कंपनी विकून सुरु केली हायड्रोपोनिक फार्मिंग; तरुण खेळतोय लाखोंच्या घरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी (गोवा)- एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वत:ची कंपनी विकून व्हर्टिकल हायड्रोपोनिक फार्मिंग (शेती) सुरु केली आहे. केमिकलमुक्त भाजीपाल्याची शेती करून राज्यातील शेतकर्‍यांना मदत करण्‍याचाही या तरुणाने निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून तो गोव्यातील हजारों शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतोय. दुसरीकडे शेतातील ऑरगॅनिक भाजीपाला विकून तो तो लाखों रुपयांची कमाई करत आहे. गोव्यात हायड्रोपोनिक फार्मिंग करणारा तो पहिला आधुनिक शेतकरी असल्याचा त्याने दावाही केला आहे.

 

अशी सुरु केली हायड्रोपोनिक फार्मिंग...

- मूळ कर्नाटकात राहाणारा अजय नाईक (33) गोव्यात आला आहे. त्याने एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब केला.
- कंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर त्याने 2011 मध्ये मोबाइल अॅप्लिकेशन बनवणारी स्वत:ची कंपनी सुरु केली.
- कंपनीचा टर्नओव्हरही चांगला होता. अवघ्या 5 वर्षांत अजयच्या कंपनीने प्रगती केली होती.

 

शेतकर्‍यांना मदत करण्याची अशी सुचली Idea
- अजयने सांगितले की, गोव्याच्या बाजारात मिळणार्‍या केमिकलयुक्त भाजीपाल्याने तो अस्वस्थ होता.
- जनतेच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे अजयच्या लक्षात आले.
- नंतर त्याने केमिकलमुक्त हायड्रोपोनिक फार्मिंग सुरु करण्‍याचा निर्णय घेतला.
- पुण्यातील एका हायड्रोपोनिक फार्मरकडून त्याने प्रशिक्षण घेतले. नंतर गोव्यात हायड्रोपोनिक फार्मिंग सुरू करण्‍याचा निर्णय घेतला.   
- अजयने 2016 मध्ये स्वत:ची कंपनी विकली. त्यातून मिळालेल्या पैशात त्याने गोव्यातील करसवाड्यात हायड्रोपोनिक फार्म सुरु केले.
- गुंतवणूकदार मिळवून अजयने 6 लोकांच्या टीमसोबत काम सुरु केले.

 

विदेशी भाजीपाला उगवून कमावतोय लाखों रुपये...
- अजयने आपल्या फार्ममध्ये एनएफटीचा वापर करून विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. गोव्यातील फाइव्ह स्टार हॉटेल, सुपर मार्केट आणि फार्मर्स मार्केटमध्ये अजयच्या विदेशी भाजीपाल्याला चांगली मागणी आहे.
- अजय यासोबत राज्यातील शेतकर्‍यांनाही प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात शेकडो शेतकरी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.
- वर्षभरातच अजयच्या लेक्ट्रेट्रा अॅग्रोटेक कंपनीचा टर्नओव्हर लाखों रुपयांनी वाढला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. सॉफ्टवेअर कंपनी विकून सुरु केलेल्या हायड्रोपोनिक शेतीचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...