आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI: मनपा शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, कोपरखैरणे येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनपा शाळेचे गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरखैरणेमधील बोनकोडे येथे अर्धवट बांधकाम स्थितीत असलेल्या मनपा शाळेत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. असून सौरभ सुनील चौधरी (12 )असे मृत विद्यार्थीचा मृत्यू आहे. सौरभ हा पाचवीत शिकत होते. याप्रकरणी बांधकाम       ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सौरभच्या आई-वडिलांनी केली आहे. 

 

सूत्रांनुसार, सौरभ आपल्या दोन मित्रांसोबत पालिका शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. यावेळी शाळेच्या आवारातच एक रिक्षा आला. रिक्षा चालकाने शाळेचे लोखंडी गेट उघडले. परंतु त्याने गेट बंद केले नाही. सौरभ व त्याचे मित्र गेट बंद करण्यासाठी गेले असता लोखंडी गेट त्यांच्या अंगावर कोसळले. यात सौरभ आणि त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला. दोघांना वाशीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले. परंतु सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला फोर्टीज हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सौरभला आई-वडिलांनी तातडीने फोर्टीज हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु तिथे बेड रिकामा नसल्याचे सांगण्यात आले. अखेर उपचार वेळेवर न मिळाल्याने सौरभचा मृत्यू झाला.

 

शाळेच्या गेटचे काम निकृष्ठ झाले होते. ते अंगावर कोसळल्याने  सौरभचा मृत्यू झाला, असा आरोप संतोष पाटील (सौरभचे मामा) यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...