आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: सांताक्रूझ एअरपोर्टच्या व्हीआयपी लाउंजला आग, लाखो रुपयांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सांताक्रूझ एअरपोर्टच्या डोमेस्टिक टर्मिनलवरील सेरोमेनियल लाउंजला आज (शनिवार) दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीने जवानांनी आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

सूत्रांनुसार, एअरपोर्टच्या गेट क्रमांक 9 च्या तळमजल्यावरील सेरिमोनियल लाउंजला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागली.
- सूचना मिळतात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत लाउंजमधील फर्निचर जळून खाक झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...