आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलशेजारील इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशामन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सकाळी लागलेल्या या आगीवर दुपारी नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत दोन गोदामे जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉकसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. आगीची भीषणता दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.