आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा Maharashtra Government Gives State Minister Status To Shirdi Trust Chairman

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा, महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‍मुंबई- शिर्डी येथील साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष सुरेश हवारे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत संबंधित विभागाने शासनादेश जारी केले आहेत.

 

साईबाबा मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी जुलै 2016 मध्ये सुरेश हवारे यांची न‍ियुक्ती करण्यात आली होती. हवारे यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने त्यांना सरकारी वाहन, मानधन, निवास स्थानासह इतर सुविधा देण्यात येणार आहेत. हावरे यांचा शासनातर्फे प्रति महिना 7500 रुपये मानधनही देण्यात येईल.

 

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्त्वातील फडणवीस सरकार आपला मित्र पक्ष शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सरकारने यापूर्वी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना नेते आणि अभिनेता आदेश बांदेकर  यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...